बिहारमध्ये नाव उलटून आठ जण बुडाले

0
9

वृत्तसंस्था
पाटणा – बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील पुनपुन नदीत नाव उलटून नऊ प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नदीपलीकडील खुंडवा बाजारातून खरेदी करून कालेन गावातील 18 ग्रामस्थ नावेतून घरी परतत असताना ही घटना घडली. शाळेतून घरी जाणारे काही विद्यार्थीही नावेत होते. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) घटनास्थळी बचावमोहिम सुरू केली आहे. नऊ प्रवाशांना वाचविण्यात “एसडीआरएफ‘ला यश आले असून एका महिलेची मृतदेहही सापडला आहे. अन्य नऊ प्रवाशांचा शोध अद्याप लागलेला नाही.

या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही नाव एका काटेरी झाडाला धडकल्याने फुटली. प्राण वाचविण्यास सर्व प्रवासी नावेच्या एका बाजूला केले. त्यामुळे नाव पाण्यात बुडाली. काही दिवसांपासून बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आलेला आहे. गंगा, सोने, पुनपुन आदी नद्यांमुळे राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.