दाभोलकरांचे खूनी सनातनचेच – सीबीआय

0
16

वृत्तसंस्था
पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेच्याच सदस्यांचा हात असल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवार) दाखल केलेल्या आरोपपत्रांत म्हटले आहे.नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आज सीबीआयने आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात दाभोलकरांच्या हत्येमागे सनातनच्या साधकांचा हात असून, या प्रकरणात अटकेत असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे हा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. तर, विनय पवार आणि सारंग अकोलकर या सनातनच्या साधकांनी गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे.

सारंग अकोलकर हा मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आहे. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आलेली आहे. पवार हा सुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तोही 2009 पासून फरार आहे. दाभोलकर यांची हत्या 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.सीबीआयने हिंदू जनजागरण समितीचा सदस्य असलेल्या वीरेंद्र तावडे याला तीन महिन्यांपूर्वी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेली आहे. सीबीआयने 40 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार बनविण्यात आलेली दोन रेखाचित्रेही आहेत.