पाकचा खरा चेहरा जगासमोर आणणार, उच्चस्तरीय बैठकीत निर्धार

0
7

वृत्तसंस्था,नवी दिल्ली,दि.19- पठाणकोट हल्लानंतर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भारतावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याला कसे उत्तर देता येईल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारला दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्याची रणनिती आखण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघासमोर उरी हल्ल्याचा मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे.

उरी हल्ल्याबाबत आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठका बोलावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, लष्करप्रमुख दलबीर सिंग सुहाग, गृह सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव उपस्थित होते. कालपासूनची ही सर्वात उच्चस्तरीय बैठक आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल, आयबी आणि रॉचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा आंतराष्ट्रीय आंतराष्ट्रीय स्तरावर उजेडात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जर आवश्यक्ता पडली तर याचे पुरावेही सादर केले जातील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात पाकचा सहभाग असल्याचे पुरावे हाती लागले आहे. दहशतवाद्यांकडून जीपीएस ट्रॅकर सापडले आहे. ज्याचा स्ट्राटिंग पाईंट पाकिस्तान आहे. या शिवाय त्यांच्याकडे पाक सैन्याचे चिन्ह असलेले हत्यारं मिळाली आहे.