आ.मोतेंचे शिक्षण सचिव नंदकुमारच्या कॅबीनसमोर ठिय्या आंदोलन

0
5

 मुंबई,दि.19- राज्यसरकारने अनिच्छेने का होईना राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन देण्याची घोषणा 30 आगस्ट रोजी केली.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्यमंत्र्यानी गणेशोत्सवाच्या आदी शिक्षकांना वेतन देऊ या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी ही घोषणा करीत मंत्रीमंडळाने मंजुरी दिली होती.परंतु त्या  शिक्षकांच्या वेतनासाठी शासन निर्णय काढायला मात्र शिक्षण सचिव नंदकुमार यांनी टाळाटाळ केली.त्यामुळे सप्टेबंर महिना लोटत चालला असतानाही किती दिवस अजून छळ होणार असा प्रश्न उपस्थित करीत आमदार रामनाथ मोते हे आक्रमक झाले असून त्यांनी  २० टक्के वेतनाचा जीआर रोखून धरणाऱ्या शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या कॅबिन समोर  ठिय्या आंदोलनाला सुरताव केली आहे.त्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली आहे.