१० दिवसांनी वाढवली जुन्या नोटा वापरण्याची मुदत

0
7
नवी दिल्ली, दि. १४ – ५०० आणि १ हजार रुपयांच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत आज मध्यरात्री संपणार होती. पण चलन तुटवडयामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने जुन्या नोटा वापरण्याची मुदत आणखी १० दिवसांनी वाढवली आहे.आर्थिकविषयाचे सचिव शशिकांत दास यांनी रुग्णालय, पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि विमानतळावर ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा वापरण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती दिली.
मंगळवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला पण त्यावेळी काही अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते. जिथे जुन्या नोटा वापरता येणार होत्या. ही मुदत आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारने या जुन्या नोटांची वैधता आणखी १० दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे रुग्णालय, पेट्रोल पंप, टोलनाके आणि रेल्वे स्टेशनवर २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा वापरता येतील. रविवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठकीत नोटबंदीच्या निर्णयाचा आढावा घेतला त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.