रायगडवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अर्धी तलवार गायब

0
20

रायगड ( महाड ), दि 11 – महाराष्ट्राच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी किल्ले रायगडावर राजदरबारात मेघडंबरीमध्ये बसविण्यात आलेल्या पुतळ्यामधील आर्धी तलवार गायब झाल्याने प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. तर या घटनेमुळे पुरातत्व खात्याविरोधात शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. या घटनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
किल्ले रायगडावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्या राजदरबारातील मेघडंबरीमधील २००९ साली कोल्हापूर येथील छत्रपती संभाजीराजे यांनी ब्राँझ धातूपासून खास बनविलेला पूर्णाकृती पुतळा विधीवतपणे स्थापन केला होता.
शनिवारी दि १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजणेचे सुमारास महाराजांच्या पूजेसाठी गेलेल्या एका शिवप्रेमीला या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामधील तलवारीचा अर्धा तुकडा गायब झाला असल्याचे लक्षात आले. या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली.