24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय राजेश गुणेरियासह राखी गुणेरियांचा भाजपात प्रवेश

राजेश गुणेरियासह राखी गुणेरियांचा भाजपात प्रवेश

0
26

तिरोड़ा,दि.11- येथील नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते राजेश गुनेरिया, नगर सेविका राखी गुनेरिया, नगर सेवक विजय बंसोड़ यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँगेसला रामराम ठोकत आज 11 डिसेम्बर रोजी गोंदियाचे पालकमंत्री ना राजकुमार बड़ोले,आमदार विजय राहंगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,माजी.जि.प.उपाध्यक्ष नेतराम कटरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या गुणेरिया परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला.तर काहींच्या मते तिरोडा येथील एका बांधकामात एमएलसी निवडणुकीआधीच अपात्र ठरणार्या या नगरसेवकांनी भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे धाव घेऊन पुढचा नगराध्यक्ष भाजप ज्याला उतरवेल त्यास निवडून देऊ अशी ग्वाही देत मदत करण्याचे आश्वासन दिले होते,त्यानुसार त्यांनी प्रवेश केल्याची चर्चा सुरु आहे.

blank