भाजप नेत्याच्या हॉटेल बिंदलला आग, सात जणांचा मृत्यू

0
9

:-अजमेरा कुटूंबाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आलेल्या दोन जावयांचाही मृत्यू
:-महिद्रा एड महिंद्रा कंपीनी नागपूरचे दोघांचा मृत्यू

खमेंद्र कटरे
गोंदिया, दि. 21-गोंदिया शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बिंदल प्लाझा या हॉटेल मध्ये आज सकाळी ४ वाजेच्या दरम्यान तेथील झी महासेलमध्ये झालेल्या शार्टसर्किटमूळे लागलेल्या भीषण आगीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.या आगीवर अग्निशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत तब्बल ५ तासानंतर निंयंत्रण मिळविले. हाटेलच्या तळं मांजल्यावर असलेल्या झी महासेलने देखील पेट घेतला तर बाजूला लागून असलेल्या नर्मदा इलेक्ट्रानिकला लागलेल्या आगीमूळे मोठे नुकसान झाले आहे.घटनेतील मृतांच्या कुटूबीयांची भेट घेऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांत्वन करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपये प्रत्येकी तात्पुरती मदतीची घोषणा केली.खासदार नाना पटोले यांनीही घटनास्थळाला भेट दिली.या हाॅटेलमधून 11 जणांचा सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
मृतांमध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील व्यक्तींचा समावेश आहे.गोंदिया येथील पंकज साडी सेंटरचे संचालक चिनू अजमेरा यांच्या कुटुबांत असलेल्या लग्न समारंभासाठी पाहूणे म्हणून आलेल्या व्यक्ती हे बिंदल प्लाजा या हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला होते. या आगीत मृत झालेल्यांमध्ये मध्यप्रदेशातील महू येथील सुरेंद्र हिरालाल सोनी व इंदोर येथील रविंद्र जैन हे अजमेरा कुटूंबियाचे जावई होते. तर महाराष्ट्रातील पुणे येथील अभिजीत विश्वास पाटिल हे महिंद्रा कंपनीच्या कामासाठी गोंदियाला आले होते.प्रेमनारायण संतोष साबु नागपूर व वरोरा येथील आदित्य कृर्हाडे,रायपूर येथील हरजित दिक्षित व राजाराम येळे यांचा समावेश आहे.
पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत हॉटेलचे 4 मजले जळून खाक झाले आहेत. तब्ब्ल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमक दलाच्या १५ गाड्यांना यश मिळाले असले तरी जिवीत हानी थांबवता आले नाही. या प्लाझा मध्ये गेल्या अनेक वर्षापासून झी महासेल नावाची दुकान सुरु होती त्या दुकानाला शार्ट शर्कीटने आधी आग लागल्याचे बोलले जात आहे. त्या दुकानात झोपलेले सात जण आग लागल्याचे जाणवताच बाहेर पळाल्याने त्याचे जिव वाचले. विशेष म्हणजे महासेल फक्तकाही दिवसापुरता असते परंतु हा महासेल गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सुरु असताना कामगार आयुक्त कार्यालय व नगपरिषेदचे दुर्लक्ष झाले होते.ज्या होटलला आग लागली त्या होटलचे सुध्दा वरचे काही बांधकाम अनधिकृत आहे. त्या बांधकामाला नगरपरिषदेसह इतर कुठल्याही विभागाचे परवानगी नाही. ज्या ठिकाणी इमारतीला आग लागली ते ठिकाण शहरातील गजबजलेल्या परीसरामधून एक आहे. या ठिकाणी रात्रीची वेळ असल्याने गर्दी नव्हती अन्यथा पुन्हा मोठी जिवीत हानी झाली असती. शहराच्या मध्यभागी तयार करण्यात आलेल्या या हॉटेल आणि लॉज तयारकरण्या करीता कसलीही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. गेल्या कित्येक वर्षापासून हे हॉटेल, झी महासेल अधिका-यांच्या आर्शिवादाने बिनदिक्कतपणे सुरू होते. त्यामूळे शहरात असे जीवघेणे प्रकार कित्येक ठिकाणी सुरू असतील यात शंका नाही.

अग्नीशमन गाड्यांना अरुंद अतिक्रमित रस्त्यांच्या फटका
बालाघाट, लांजी भंडारा, तमुसर, गोंदिया, तिरोडा व अदानी पावरप्लांट येथील अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे प्रयत्न करीत असतांना अग्नीशमनदलाच्या चालकाला मात्र गांधी चौक ते गोरेलाल चौक व नेहरू चौक मार्गावर व्यापारी व काही लोक प्रतिनिधींनी शासकिय जागेवर अतिक्रमण करून वाढविलेल्या आपल्या प्रतिष्ठांन व खासगी इमारतींमुळे वाहने घटनास्थळांपर्यंत जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत होता. अतक्रमणचा प्फटका ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन विभागाला बसला. हे रस्ते रूंद असते व अतिक्रमण नसते तर काही जीव वाचविण्यात याशही आले असते.

बंद थाटबाट मध्ये होते 10-15 भरलेले सिलेंडर
बिंदल प्लाजा येथे असलेल्या थाटबाट रेस्टारेंट गेल्या दिड महिन्यापासून बंद होता. या बंद हॉटेलमध्ये १० ते १५ व्यवसायीक सिलेंडर भरले होते. त्या सिलेंडरचा स्पोट सुध्दा या आगीमूळे झाल्याने आग अजून पसरली. दिड महिन्यापासून हे रेस्टारेंट बंद असतांना एवढा मोठा सिलेंडरचा स्टॉक तिथे कसा होता हा प्रश्न उपस्थित झाला असून या सिलेंडरचा साठ्यामूळे गॅस एजंसी आणि जिल्हा पुरवठा विभाग संशयाच्या भोव-यात आला आहे. अग्नीशमन दलाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल बिंदल प्लाजा च्या वरच्या माळ्यावर असलेल्या एका खोलीत तीस ते पसत्तीस सिलेंडर होते अशी माहिती दिली.

जिव धोक्यात घालून दुर्गेश रहागंडाले व हर्षल पवारचे मदत कार्य
होटल बिंदल प्लाजाना लागलेली आग व त्यात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत होता, त्यावेळी घटनास्थळी अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी उपस्थित होती. पण या घटनेचे गांभीर्य ओळखून आणखी जिवीत हानी होऊ नये म्हणून शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दुर्गेश रहांगडाले,त्यांचे सहकारी मित्र हर्षल पवार व त्यांच्या सहकार्यानी आपल्या जीवावर खेळून त्या हॉटेलच्या आग लागलेल्या माळ्यावर चढून कुणी फसलेले तर नाही ना हे शोधण्याचे काम पोलीस,अग्निशमन दलासोबत त्यांनी केले.तसेच आग आटोक्यात आणण्यास मदत करीत मृतदेह बाहेर काढण्यासही सहकार्य केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदरा राजेंद्र जैन,भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक इंगळे,शिव शर्मा यांच्यासह राकेश ठाकूर,गप्पू गुप्ता यांनीही घटनास्थळी पोचून मदत कार्यात हातभार लावला.

हाॅटेल बिंदल प्लाझा भाजपचे जेष्ठ नेते बबली अग्रवालांचे
शार्ट सर्किटमूळे आग लागलेले हाॅटेल बिंदल प्लाजा हे भाजपचे जिल्ह्यातील जेष्ठ नेते ,जनता सहकारी बॅकेचे अध्यक्ष डॉ. रोधेश्याम (बबली) अग्रवाल यांच्या मालकीचे आहे.हाॅटेलचे बांधकाम सुरु असतानाच परवानगीचा विषय नेहमीच चर्चेत राहायचा.गोरेलाल चौक वर्दळीचा चौक असताना पार्किंगसाठी जागा नसतानाही चौकात हे हाॅटेल तयार करण्यात आले होते.गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांचे ते चुलत भाऊ असल्याचेही बोलले जात आहे.भाजप नेत्याचे हाॅटेल असल्याने राज्यातील सरकार हे प्रकरण निष्पक्षपणे हाताळते की काय करते याकडे लक्ष लागले आहे.

हाॅटेल बिंदलच्या कागदपत्राची तपासणी सुरु-मुख्याधिकारी पाटील
हॉटेल बिंदलच्या बांधकामा संदर्भातील सर्व कागज पत्रांची तपासणी करण्यात येत आहे.त्यांना 3 माळ्याची परवानगी होती, किती माळे अनाधिकृत आहेत याची चौकशी कागदपत्र नगरपालीकडे सादर करण्यात आली आहे. त्यानूसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल असे गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले.

सर्वच बाजूने चौकशी होणार-पोलीस अधिक्षक भुजबळ
गोरेलाल चौक येथे घडलेल्या प्रकरणाबद्दल पोलीस विभाग स्वतंत्र चौकशी करणार असून या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आकस्मात घटना म्हणून आधि नोंद करण्यात येणार आहे. या सर्व घटनेची दखल वरच्या पातळीवर कळविण्यात आली आहे. अजून तीन ते चार तास बचाव कार्य सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ यांनी दिली. या घटनेत ११ जणांना वाचविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.तर तिकडे या हॉटेल मध्ये आगीला प्राथमिक दृष्ट्या आटोक्यात आणण्याकरिता कुठलीही उपाययोजना हॉटेल प्रशासनातर्फे करण्यात आली नव्हती असे अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रकाश कापसे यांनी सांगितले.तसेच आगीचे कारण शॉर्ट्स सर्किट असल्याचे सांगण्यात येत असून जबाबदार व्यक्तीवर कारवाही करण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे .तर हाटेल मध्ये ठेवण्यात आलेल्या गॅस ८ ते १० सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने रुद्ररुप धारण केले.र हाटेल मधील किचन मागील दोन महिन्या पासून बंद असून इतक्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा साठा कसा जमा करून ठेवला याचाही तपास पोलीस घेत आहेत.