30 डिसेंबरनंतर भ्रष्टाचा-यांसाठी ‘बुरे दिन’ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0
15

वांद्रे- कुर्ला संकुलात‍ पंतप्रधान मोदींनी केला मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ…

मुंबई(वृत्तसंस्था)दि.24-50 दिवसानंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी होऊन बेईमानांना त्रास सुरु होणार आहे. हे सरकार तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही. परंतु, गरीबांचे हक्क मारणाऱ्यांना सरकार सोडणार नाही. नियम पाळा आणि कायद्याने वागा, असा इशारा काळेपैसावाल्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी,सुरेश प्रभू,राज्याचे सांस्कृतिक व शिक्षण मंत्री विनोद तावडे,महसुल मंत्री चंद्रकांत पाटील,केंद्राचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजन- भूमीपूजनाच्या कार्यक्रमानांतर वांद्रे -कुर्ला संकुलात आयोजित सभेत मोदी बोलत होते. सरकार बदलले आहे, आता नियम मोडणाऱ्यांना कदापी सोडले जाणार नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान भाषणापूर्वी मोदींच्या हस्ते मुंबईसाठी 1 लाख 6 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. त्यात मेट्रो प्रकल्पाचाही समावेश आहे.