७ जणांच्या मृत्युनंतरही बिंदल प्लाझाचा संचालक मोकाटच?

0
9

जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा प्रकार,सत्ताधारी राजकीय शक्तीचा तपास यंत्रणेवर दबाव
खेमेंद्र कटरे,गोंदिया,दि.२४ : शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौकात बुधवारी घडलेल्या अग्नीकांडानंतर नगर परिषदेच्या अग्नीशामक विभागाच्या कार्यकुशलतवर काहींनी प्रश्नचिन्ह उभे केले.परंतु घटनास्थळाकडे जाणाèया रस्त्यालगतच्या जागेवर अतिक्रमण करुन आपली व्यवसायिक दुकाने थाटणाèया व्यापारी व तथाकथितांनी काही होर्डींग्स व बॅनरचे जाळे विणून तसेच नालीवर केलेले अतिक्रमण काढण्याची तसदी मात्र अद्यापही घेतलेली नाही.त्यातच ४ दिवस घटनेला लोटूनही पोलीसांनी अद्यापही हॉटेल qबदल प्लाझाचे संचालक आशिष राध्येशाम अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही.७ जणांचा जिव गेल्यानंतरही पोलीस व जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी केलेली टाळाटाळ म्हणजे राज्यातील सत्ताधारी भाजप पक्षाच्या राजकीय दबावतंत्र असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.डॉ.राध्येशाम अग्रवाल यांच्याएैवजी हे होटेल दुसèया कुणाचे असते तर याप्रकरणात आत्तापर्यंत गुन्हा दाखल झाला असता नागरिकांनी त्या होटेल मालकाच्याविरोधात एल्गार पुकारला असता.परंतु अद्यापही त्या परिसरातील व्यापारी वर्ग जे सोशल मिडियाच्या माध्यमातून नैतिकता पाळण्यास सांगत आहेत,त्यांनी ७ जणांच्या जिव गेल्यानंतरही अग्रवाल कुटूंबावर गुन्हा दाखल कधी केला जाणार याची विचारपूस पोलीसांना केली का अशा प्रश्नही चर्चेत येऊ लागला आहे. बिंदल प्लाझामधील थाट बाट रेस्टारेंट दोन महिन्यापासून बंद असतानाही त्याठिकाणी व्यवसायिक भरलेले सिqलडर होते.त्यापैकी किमान ६ सिqलडरचा स्पोट झाल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले व स्पोट झालेले सिqलडर जप्तही करण्यात आले.मात्र उर्वरित सिqलडर कुठे गायब झाले हे सांगायला कुणीच तयार नाही.या सर्व प्रकरणानंतर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात फक्त मर्ग दाखल करण्यात आले आहे.या अग्निकांडाचे तपास अधिकारी असलेले पोलीस उपनिरिक्षक बोरकर यांच्यानुसार जोपर्यंत सर्व विभागाचे ऑडिट रिपोर्ट येणार नाही,तोपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे.आत्तापर्यंत फक्त विज वितरण कंपनीने आपला फॉयर ऑडिट रिपोर्ट सादर केला आहे.तर नगरपरिषद,महसूल विभाग व अग्निशमन विभागाचा फायर ऑडिट न आल्याने गुन्हा दाखल करण्याची प्रकिया लांबल्याचे म्हणने आहे.वास्तविक एवढ्या मोठ्या घटनेनंतर आणि जिवित हानी झाल्यानंतर होटल संचालकावर मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे आवश्यक होते.
जिल्हाप्रशानाची भूमिका संशयास्पद
होटेल qबदल प्लाझा ला आग लागल्यानंतर शहरातील सर्वच होटेल,रेस्टारेंटसह इतर व्यवसायिक इमारतीच्या फायर आडिटसह परवान्याचा प्रश्न समोर आला.यासंबधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी लगेच घटनेचे गांर्भीर्य लक्षात घेत चौकशीचे आदेश द्यायला हवे होते.तसेच त्याठिकाणी व्यवसायिक सिqलडर कसे आढळले,परवाना नसताना होटेल कसे सुरु होते याबाबत चौकशी समिती बसविणे गरजेचे होते.परंतु त्यांनी तसे केलेच नाही,उलट कुठल्याही वृत्तपत्र प्रतिनिधीला सहकार्य ही केले नाही.जेव्हा जिल्हाधिकारी यांना विचारण्यासाठी भ्रमणध्वनी करण्यात आले तेव्हा त्यांनी भ्रमणध्वनीच बंद करुन टाकल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.