23.5 C
Gondiā
Sunday, July 19, 2026
Home Top News महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

महाबळेश्वरच्या वेण्णा लेकमध्ये 0 अंश तापमान

0
18

सातारा, दि. 8 – जवळपास संपूर्ण महाराष्ट्र सध्या थंडीने गारठला आहे. सर्वत्र प्रचंड गारवा, बोचणारा थंडगार वारा आणि त्यापासून बचावासाठी शेकोटीची धडपड असे चित्र पाहायला मिळत आहे.

महाबळेश्वरच्या सुप्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात शून्य अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तापमान खालावल्यामुळे पर्यटक चांगलेच गारठले आहेत. मात्र, गुलाबी थंडीमुळे पर्यटकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. शून्य अंश तापमानामुळे झाडांवरील दवबिंदू गोठले असून परिसराला बर्फाच्छादित रूप आलं आहे.