गोंदिया व तिरोडा न.प.सार्वत्रिक निवडणूक १,३६,४६५ मतदार बजावतील मतदानाचा हक्क

0
21

गोंदिया,दि.७ : गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी ८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गोंदिया नगराध्यक्ष पदासाठी १४ उमेदवार तर तिरोडा येथे ८ उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. गोंदिया येथून २५७ उमेदवार आणि तिरोडा येथून ७२ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात आहे. गोंदिया येथील २१ प्रभाग आणि तिरोडा येथील ८ प्रभागासाठी निवडणूक होत आहे. गोंदिया येथे १४३ आणि तिरोडा येथे ५८ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. वृध्द व अपंग मतदारांना मतदान केंद्रावरील मतदान कक्षात पोहोचण्याची गैरसोय होवू नये यासाठी रॅमची सुविधा सर्वच मतदान केंद्रावर करण्यात आली आहे.
गोंदिया व तिरोडा नगरपालिका क्षेत्रात १ लाख ३६ हजार ४६५ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. गोंदिया येथे १ लाख १५ हजार ६०७ मतदार यामध्ये ५७ हजार ६ पुरुष आणि ५८ हजार ६०१ स्त्री मतदार तर तिरोडा येथे १० हजार २२४ पुरुष व १० हजार ६३४ स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय येथे तर तिरोडा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल.