जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 10 जवान शहीद

0
11

जम्मू-काश्मीर, दि. 26 – काश्मीरमधील गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या झालेल्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिका-यांनी दिली आहे.
बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले. लष्करानं शोधमोहीम राबवत आतापर्यंत एका अधिका-यासह सात जवानांना वाचवण्यात यश मिळवलं आहे. उर्वरित शहीद जवानांचे मृतदेह बर्फाच्या ढिगा-याखालून काढण्यात आले आहेत.