खा.नाना पटोले नागपूरच्या न्युराॅन रुग्णालयात भरती,प्रकृती स्थिर

0
28

गोंदिया/नागपूर, दि. 29 – भंडारा-गोंदिया क्षेत्राचे भाजपाचे खासदार नानाभाऊ पटोले यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने आहे. त्यांना नागपुरच्या न्युराॅन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना होश अाल्याचे सांगितले जात आहे.आज सकाळी साकोली तालुक्यातील शिवणीबाध येथे विदर्भस्तरीय खासदार जलतरण स्पर्धेचे उदघाटन करताना ही घटना घडली. स्पर्धेला हिरवा झेंडा दिल्यानंतर त्यांना भोवळ आली.लगेच त्यानंतर पहिले साकोलीच्या ग्रामीण रूग्णालयात नंतर तेथून भंडारा येथील डाॅ.गोपाल व्यास यांच्या रुग्णालयात हलविण्यात आले.त्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन प्रकृती चिंताजनक असल्याने विधानपरिषद आमदार डाॅ.परिणय फुके, आमदार बाळा काशीवार व राष्टॅ्वादी काँग्रेसचे नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांच्यासह सोबतच्या मित्रमंडळीनी त्यांना नागपूरच्या मेडिट्रीना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. नागपूरच्या नुराॅन रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून ते बोलत असल्याचे तेथील त्यांच्या चाहत्यांनी सागिंतले आहे.