29.6 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन आज

मुख्याध्यापक संघाचे अधिवेशन आज

0
29

अर्जुनी मोरगाव दि. 29-: जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अधिवेशन रविवारी (दि. २९) निमगाव येथील श्याम माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाचे उद् घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते विदर्भ संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी मारोतराव खेडेकर, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.सदस्य कमला पाऊलझगडे,सभापती अरविंद शिवणकर, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, उपशिक्षणाधिकारी मोहबंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाला जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष यशवंत परशुरामकर, तालुकाध्यक्ष राधेश्याम कापगते यांनी केले आहे.