ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सभेत निर्णय : विविध आघाड्यांची स्थापना

0
9

ओबीसींचा लढा अधीक मजबूत करण्यावर भर

गोंदिया दि. 29 –: १९३१ साली इंगÑजांनी केलेल्या सर्व्हेक्षणात ओबीसी समाजाची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५२ टक्के एवढी होती. हा समाज मागासवर्गीय म्हणून संविधानात नोंद आहे. परंतु, या समाजाकडे आत्तापर्यंतच्या सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता संघर्षाचा वणवा पेटविणे गरजेचे आहे. ८ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात आला. त्याची फलश्रूती म्हणूम मुख्यमंत्री देवेंदÑ फडणवीस यांनी ओबीसी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केली. केवळ ही घोषणाच असू नये. येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद असावी. ओबीसींच्या हक्काचा लढा अधीक मजबूत करण्यात येईल. अगामी काळात त्याकरिता विविध आघाड्यांची स्थापना करण्यात येईल, असे विविध निर्णय ओबीसी संघर्ष कृती समितीच्या जिल्हास्तरीय सभेत शनिवारी(२८) घेण्यात आले.
गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात मासीक सभा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, महासचिव मनोज मेंढे, जीवन लंजे यांच्या पÑमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी ओबीसी समाजाच्या उत्थानाकरिता आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. उशीरा का होईना, राज्य शासनाने ओबीसी समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय स्थापण करण्यात येणार असल्याचा मंत्रीमंडळात निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय रेंगाळत न ठेवता येत्या अर्थसंकल्पात एससी आणि एसटी पÑवर्गाकरिता असलेल्या आर्थिक, समाजिक बाबींचा अंतर्भाव करण्यात यावा. ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, ही मागणी देखील आता रेटून धरण्यात येणार आहे. ओबीसी समाजाच्या हक्कांचा लढा आता गल्लीबोळापर्यंत पोहोचायला लागला. त्यामुळे हा लढा अधीक मजबूत करण्याकरिता पÑत्येक गावस्तरावर कार्यकारिणींचे जाळे उभारून सदस्यता अभियान राबविण्यात येणार आहे. शेतकरी, महिला, युवक यांची कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व समाजातील वरिष्ट पÑतिनिधींना सोबत घेवून समन्वय समिती तसेच समाजावर होणाº्या अन्यायाविरोधात लढण्याकरिता सुरक्षा समितीचेही गठन करण्यात येणार असल्याचे ठराव घेण्यात आले. समाजाची आदर्श आचारसंहिता देखील तयार करण्यात येणार आहे. येत्या फेबÑुवारी महिन्यात हा कार्यकÑम आखून मार्च महिन्यापासून अमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती बबलू कटरे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष कैलाश भेलावे, सावन डोये, संतोष वैद्ये, चंदÑकुमार भेलावे, कृष्णा बÑाम्हणकर, श्री कापगते, विनायक येळेवार, अरूण बोपचे आदींची उपस्तिी होती.