भाजप नेत्याच्या मकरधोकडा आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार

0
13

सर्पंदंशप्रकरणापासून चार वर्षा ४ विद्याथ्र्यांचा मृत्यु,तरीही भाजपसरकारचे पाठबळ
गोंदिया,berartimes.com दि.२१- जिल्ह्यातील देवरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत येणाèया मकरधोकडा येथील स्वामी रामकृष्ण आदिवासी आश्रमशाळेच्या इयत्ता नवव्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर आश्रमाशाळेच्याच चौकीदाराने बलात्कार केल्याची घटना आज (दि.२१)मंगळवारला उघडकीस आली आहे.या प्रकरणाची तक्रार नोंदविण्याची प्रकिया देवरी पोलीस ठाण्यात सुरु असल्याची माहिती देवरीचे ठाणेदार राजेश तटकरे यांनी बेरार टाईम्सला दिली.तर गेल्या काही वर्षापासून सदर आश्रमशाळेतील घडामोडी बघता सदर आश्रमशाळा कायमचीच बंद करणे गरजेचे असून सदर संस्थेच्या संचालकाना पाठबळ देणाèया भाजप,काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही निषेध नोंदविण्याची गरज असल्याचे विचार आदिवासी संघटनांच्या सामाजिक कार्यकत्र्यांनी व्यक्त केले आहे.निव्वळ आर्थिक लाभापोटी आदिवासी समाजातील काही राजकीय नेते सदर संस्थाचालकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप सुध्दा केला आहे.
या निवासी असलेल्या आदिवासी आश्रमशाळेत चार वर्षांपुर्वी म्हणजे जुर्ले २०१२ मध्ये सर्पदंश प्रकरणाने तीन विद्याथ्र्यांचा मृत्यू झाला होता.त्यानंतर २०१७ मध्ये जानेवारी महिन्यात अतिसाराने एका विद्याथ्र्याचा मृत्यू झाला.त्या घटनेची फाईल बंद होत नाही, तोच आज(दि.२१) त्याच शाळेतील एका नवव्या वर्गातील देवरी तालुक्यातीलच लोहारा परिसरातील निवासी असलेल्या एका काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील विद्यार्थिनीवर आदिवासी आश्रमशाळेच्या चौकीदाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली.सदर चौकीदाराला हे कृत्य करतांना त्या परिसरातील एका गुराख्याने बघितल्यानंतर या प्रकरणाचे qबग फुटल्याचे बोलले जात आहे. ही निवासी आदिवासी आश्रमशाळा देवरी तालुक्यातील कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्थेचे प्रमुख,गोंदिया जिल्हा मजुर सहकारी संघाचे माजी अध्यक्ष व भाजपचे वरिष्ठ नेते झामसिंह येरणे यांची आहे.त्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी घनिष्ट संबध असून नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी नेहमीच असतात.त्यांच्या देवरी तालुक्यातील मकरधोकडा या निवासी आदिवासी आश्रमशाळेत २०१२ मध्ये सर्पदंशाने तीन विद्याथ्र्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही शाळा काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शासनाने बंद केली होती. परंतु, राजकीय दबावानंतर परत सुरू करण्यात आली. २० जानेवारी २०१७ रोजी एका आदिवासी विद्यार्थिनीचा अतिसाराने मृत्यू झाला. ती शाई वाळते नाही, तेच आज २१ फेबदृुवारी रोजी देवाटोला या गावच्या इयत्ता नववीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील चौकीदाराने सायंकाळच्या दरम्यान शाळेबाहेरील शेतशिवारात तिच्यावर बलात्कार केला. ही बातमी बाहेर पसरू नये, याकरिता शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थिनीवर दबाव घातल्याचा आरोप आदिवासी संघटनानी केला आहे. आदिवासी संघटनांना माहिती पडल्यामुळे देवरी पोलिस आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने या घटनेसंदर्भात नोंद घेतली असून सदर प्रकरणात देवरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याची प्रक्रीया सुरू असल्याची माहिती ठाणेदार राजेश तटकरे यांनी दिली.तर प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी यांनी सुध्दा यासंबधात विभागाकडे माहिती आल्याचे सांगत पोलीस तक्रारीनंतरच विभाग आपली पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.दरम्यान या विभागाच्या लोकप्रतिनिधींची भूमिका अद्यापही जाहीर न झाल्याने आदिवासी समाजात असंतोष दिसून येत आहे.तर काँग्रेसचे नेते म्हणवून घेणारे एक नेते मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील गोंदियाला येत असल्याने याप्रकरणात आंदोलन वगैरे बुधवारला करता येणार नाही असे सांगत वेळ मारुन नेल्याने त्या तथाकथीत नेत्याच्या भूमिकेवरही शंका वर्तविली जात आहे.