परशुराम विद्यालयात व्यसनमुक्त कार्यक्रम

0
19

गोरेगाव दि.21-परशुराम विद्यालय मोहगाव बु.येथे बाहेकार व्यसन मुक्ती केंद्र गोंदिया च्या वतिने “संकल्प व्यसन मुक्तीचा ” जनजाग्रती कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेचे मुख्याध्यापक श्री.बी.डब्लु.कटरे होते.बाहेकार व्यसन मुक्ती केंद्राचे समन्वयक श्री.खेडीकर,समोपदेशक श्री.चौधरी , श्रीमती.पटले मँडम यांनी विद्यार्थ्याना व पालकांना व्यसन मुक्तीवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.डी.डी.चौरागडे तर आभार प्रदर्शन श्री.टी.एफ.ईलपाचे यांनी केले.कार्यक्रमात शालेतील सर्व शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.