वन्यजीव विभागाच्या खडकी-डोंगरगाव जंगलात अज्ञात वनतस्करांनी लावली आग

0
14

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.२४(berartimes.com)-उन्हाळ्याचे दिवस आले की जंगलाला वणवा लागणे काही नवीन नाही.त्यातच परंतु गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा वन्यजीव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाèया न्यु नागझिरा नवेगावबांध व्याघ्रप्रकल्पाच्या कम्पार्टेमेंट क्रमांक ५६३ मध्ये बांबु तस्करांनी लावलेल्या आगीमूळे जंगलातील वनमजुरांची झोपडी व सायकलीची मात्र राख रांगोळी झाल्याची घटना २२ मार्च रोजी घडली.२१ मार्च रोजी याच भागातून काही बांबू तस्करांना पकडण्यात आले होते.त्यांनतरही ही आग लावण्यात आल्याची माहिती वन्यजीव विभागाच्यावतीने देण्यात आली नव्हती.यासंबधीची माहिती जेव्हा बेरार टाईम्सला देण्यात आली,तेव्हा घटनास्थळावर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आले असता वन्यजीव विभागाच्या जंगलात आग लागल्याचे उघडकीस आले.सोबतच कचरा जाळण्याच्या निमित्ताने डोगरगाव डेपो येथे लावलेल्या आगीनेच डेपोतील जळाऊ लाकडे जळत असल्याचे बघावयास मिळाले.
बांबु तस्करांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.मात्र आग लावण्यात आल्याची माहिती समोर आली नव्हती,ज्यामध्ये दोन सायकलीसह झोपडी जाळण्यात आली.या आगीमध्ये वन्यजीव अभयारण्यातील गट क्रमांक ५६३ मध्ये ४.५ हेक्टर,गट क्रमांक ५७२ मध्ये ३.७५ हेक्ट गट क्रमांक ५७८ मध्ये ६.५ हेक्टर जंगल आगीच्या कचाट्यात सापडले होते.ही आग मात्र व्याघ्र प्रकल्प सरंक्षण दल,वनरक्षक,वनराल,गावकरी व ग्रामवनसमितिच्या सहकार्याने आटोक्यात आणण्यात आणली गेली.
वन्यजीव विभागाच्या खडकी येथील आगीचे प्रकरण शांत होत नाही,तेच गोंदिया वनविभागातंर्गत येत असलेल्या डोंगरगाव डेपो येथे सुध्दा तेथीलच चौकीदाराने कचरा जाळण्याच्या निमित्ताने लावलेल्या आगीमूळे डेपोतील लाकडे जळाली.ही आग आज(दि.२४) शुक्रवारला सुध्दा सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन ये जा करणाèयांना नागरिकांना बघावयास मिळाली.डेपोत जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता तिथे त्यावेळी कुणीही हजर नव्हता.तर मोहफुल वेचण्यासाठी आलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार चौकीदारानेच ही आग गुरुवारला लावल्याची माहिती समोर आली.
कोहमारा-देवरी राष्ट्रीय मार्गावर असलेल्या डोंगरगाव येथे वनविभागाचा डेपो आहे.या डेपोमध्ये काही मोहफुलाची झाडे सुध्दा आहेत.आज जेव्हा या डेपोला भेट दिली तेव्हा या डेपोत वणवा लावण्यात आल्याचा प्रकार दिसून आला,त्या वणव्यामुळे डेपोमध्ये असलेल्या लाकडांनी सुध्दा पेट घेतली आहे.ती आग विझविण्यासाठी कुठलेच प्रयत्न केले गेले नाही.डेपोमध्ये कचरा असला तरी आग लावली जात नाही कारण त्याठिकाणी जंगलातून आणलेली व विक्रीसाठी असलेली लाकडे ठेवलेली असतात असे असतानाही त्या आगीकडे वनरक्षक,वनपरिक्षेत्राधिकारी यांचे लक्ष कसे गेले नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.तर ज्या व्यापाèयाला लाकडे खरेदी करतांना तोटा बसला असेल त्याने चौकीदाराला हाताशी धरुन अशा प्रकार करुन डेपोतील लाकडे तर जळाली आत्ता काय करायचे असे प्रकरण सुध्दा करण्यासाठी हा प्रकार घडविला गेला असावा अशी चर्चा सुरु होती.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला जंगल हा वन्यजीव विभागाकडे असून तो राखीव जंगल आहे,या जंगलात देखील फायर लाईनच्या आत व बाहेर आग लागल्याचे दिसून आले.या आगीमुळे झाडांचे नुकसान झाले आहे. झाडांचा कोळसा झाला आहे. खडकी येथील नवेगाव नागझिरा वन्यजीव अभयराण्याच्या वनक्षेत्ररक्षकाच्या शासकीय निवासस्थानाला लागूनच असलेल्या परिसरात आग लावून विझविण्यात आल्याचे बघावयास मिळाले.

अज्ञातांनी लावलेल्या आगीवर नियंत्रण- रविकिरण गोवेकर,उपसंचालक न्यु नागझिरा-नवेगावबांध वन्यजीव विभाग
वन्यजीव विभागातंर्गत येत असलेल्या कोहमारा वनपरिक्षेत्रातील खडकी येथील कम्पार्टेमेंट क्रमांक ५६३ मध्ये अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या आगीमध्ये वनमजुरांच्या अस्थायी झोपडीसह त्यांच्या सायकलीचे नुकसान झाले असून या आगीवर लगेच नियंत्रण मिळविण्यात विभागाला यश आल्याची माहिती दिली.सोबतच याप्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असून जवळच्याच गावातील बांबू तस्करांना पकडल्यानंतर ही आग लावण्यात आल्याचे सांगितले.पकडलेल्या बांबु तस्करांना ४ दिवसाची देवरी न्यायालयाने वनकोठडी सुध्दा आज दिल्याची माहिती दिली.

अनावधानाने लागली आग-आरएफओ आकरे
डोगंरगाव डेपो येथील लाकडांना लागलेली आग ही जाणीवपुर्वक लागलेली नसून कचरा गोळा करुन एकाठिकाणी जाळण्यात आला.त्यानंतर शेजारी असलेल्या जुन्या जळाऊ पण कामात येऊ शकणार नाही अशा एका लाकडाच्या भागाला ही आग लागली आहे.कचरा जाळतांना खबरदारी घेण्याच्या सुचना आपण तेथील कर्मचारी व महिलांना दिली होती अशी माहिती डोंगरगाव डेपोचे वनपरिक्षेत्राधिकारी शेषराज आकरे यांनी सांगितले.तसेच डेपोमध्ये लाकडे असल्याने आग लावण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही म्हणाले.