माध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

0
11

सोलापुर – सोलापुरमधील करमाळा जिल्ह्यातील कोर्टी गावातील शाळेत माध्यान्हभोजनातून चारशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास माध्यान्ह भोजन म्हणून खिचडी देण्यात आली होती. मात्र ती खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना उलटी, पोटदुखीचा त्रास होऊ लागला.
सुरुवातीला या मुलांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यातील काही मुलांची प्रकृती खालावल्याने त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. ६१ विद्यार्थ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापूरला नेण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.