देशावर आर्थिक संकट येणार, नरेंद्र मोदींसाठी ‘बुरे दिन’ येण्याचे संकेत

0
14

बुल़डाणा,दि.29 – गेल्या साडेतीनशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराज यांनी सुरु केलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत त्यांचे 15 वे वंशज सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज शनिवार (29 एप्रिल) रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास जाहीर केले. शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी ही घटमांडणी करण्यात आली होती.अतिवृष्टीच्या आपत्तीसह यंदा पीक परिस्थीती सर्वसाधारण राहील. घुसखोरी वाढणार असून सैनिकांची धावपळ होईल. शिवाय राजा अर्थात पंतप्रधान कायम राहणार असले तरी देशासमोरील आर्थिक संकाटांची टांगती तलवार पाहता नरेंद्र मोदींसाठी ‘बुरे दिन’ येण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.
गावाबाहेरील नरहरी वाघ यांच्या शेतात चंद्रभान महाराजांचा जय जयकार करत मांडणी केलेल्या घटाचे भाकीत वर्तविण्यात आले. तेव्हा शेतकरी मोठया प्रमाणावर उपस्थित होते. ३० ते ४० फूट व्यासाच्या वर्तुळात १८ कडधान्य, तेलवात,ज्वारी,गहु व इतर धान्य मांडण्यात येते.यामध्ये सरकीचाही समावेश असतो.खड्डयात चार ढेकळे ठेऊन या चार ढेकळांनज्ञ पावसाळयाचे चार महिन्याचे प्रतिक जुन, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर असे समजतात. या चार ढेकळांवर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. त्या घागरवर सांडोळी, कुरडोई, करंजी, पुरी असे ठेवण्यात येते. घटाच्या खड्डयाचे बाहेर अंबाडी, सरकी, हिवाळी मुंग, गहु, हरभरा, करडी, मसुर जवस, लाख, वटाणा, साळी आदी दोन्ही हाताच्या ओंजळीत बसेल एवढे ठेवण्यात येते. अशी मांडणी अक्षय तृतीयेला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे भाकीत वर्तविण्यात येते. त्यानुसार आज वर्तविण्यात आले.