24.3 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home राजकीय दिग्विजय सिंहांची गोवा, कर्नाटकच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी

दिग्विजय सिंहांची गोवा, कर्नाटकच्या प्रभारीपदावरून उचलबांगडी

0
25
नवी दिल्ली, दि. 29 – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना गोवा आणि कर्नाटकमधील पक्षाच्या प्रभारीपदावर काढण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी आता ए. चेल्लकुमार हे गोव्याचे प्रभारी तर कर्नाटकच्या प्रभारीपदी के. सी. वेणुगोपाल यांची नियुक्त करण्यात आली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पार्टीला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही तेथे सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आले नाही. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी झाल्याचे बोलले जात आहे.गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळालेल्या असतानाही सत्ता स्थापन करू न शकल्याने काँग्रेसवर अनेकांनी उपहासात्मक टीका केली.
blank