पुण्यातील भाऊ रंगारी गणेश मंडळास धमकीचे पत्र

0
34

पुणे,दि.22-गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षावरून निर्माण झालेला वादाला आता वेगळे वळण लागले आहे. पुण्याचा गणेशोत्सव भाऊ रंगारी यांनी सुरू केला आहे. भाऊ रंगारी हेच गणेशोत्सवाचे जनक आहेत. लोकमान्य टिळक गणेशोत्सवाचे प्रसारक आहेत, अशी भूमिका घेणार्‍या भाऊ रंगारी गणेश मंडळाने घेतली आहे.त्यातच पुण्यातील पहिला मानाचा गणपती असलेल्या भाऊ रंगारी गणेश मंडळाला आज धमकीचे पत्र आले आहे. ‘तुम्हाला ठेचल्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही…’ असा मथळा असलेले धमकीचे पत्र एका बंद लिफाफ्यात आज (मंगळवारी) दुपारी पावणे तीनच्या सुमारास मंडळाला मिळाले. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे मंडळाचे विश्‍वस्त सुरज रेणुसे यांनी सांगितले.
भाऊ रंगारी यांनी लोकमान्य टिळक यांच्या आगोदर गणेशोत्सव सुरू केला होता. रंगारी यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवास 125 वर्ष पूर्ण झाल्याचा दावा मागील वर्षी भाऊ रंगारी गणेश मंडळाने केला होता. मात्र, सरकारी पातळीवर लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाप्रमाणे शतकोत्तर रौप्यमहोत्स साजरा केला जाऊ लागल्याने वाद वाढत गेला.