मधमाश्याच्या हल्यात तरुणाचा मृत्यू

0
14

सालेकसा,दि.22(मनोज डोये)-तालुका मुख्यालयापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या धानोली(रेल्वे)येथे दोन तरुणांवर मधमाश्यांनी केलेल्या हल्यात एका युवकाचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना सोमवारला घडली.तर दुसरा युवक हा जखमी आहे.दिनदयाल मेश्राम (वय 22) व मयुर शिवप्रकाश कांबळे हे दोघे सोमवारला सकाळच्या सुमारास शेतशिवाराकडे फिरावयास गेले असता त्यांच्यावर मधमशांना हल्ला केला.त्यांनतर ते जखमी अवस्थेत गावात आल्यावर उपचारासाठी सालेकास येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु वैद्यकिय अधिकारी डाॅ.पी.एस.रामटेके यांनी त्या युवकांवर उपचार न करताच आरोग्यसेविकेला उपचार करण्यास सांगितले.काही वेळानंतर त्या जखमी युवकांना घरी जा असा सल्ला दिल्याने ते दोन्ही घरी परतले.परंतु घरी परतल्यानंतर मयुर कांबळे याची प्रकृती खालावल्याने त्याचा घरीच मृत्यू झाला.