रोपे जंगलात पोलिस नक्षल चकमकीत एक नक्षलवादी ठार

0
13

आल्लापली,दि.25(सुचित जम्बोजवार)- एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलिस स्टेशन हद्दितील रोपे गांव जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमकीत एका पुरुष नक्षल्याला आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी ठार केले आहे.आज (शुक्रवार) सकाळी 7 दरम्यान जारावंडी पोलिस व गडचिरोली विशेष पोलिस दल नक्षल शोध मोहीम राबवित असतांना रोपे गांव जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अचानक गोळीबार केला. उत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक नक्षली ठार झाला.इतर माओवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून गेले.ठार नक्षल्याचा मृतदेह उत्तरीय तपासणी व ओळख पटविण्यासाठी गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.पोलिसांनी हत्यारासह नक्षल साहित्य जप्त केले आहेत.