25.2 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home Top News माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड केली – मनोहर पर्रीकर

माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड केली – मनोहर पर्रीकर

0
19

नवी दिल्ली, दि. २३ – देशाच्या काही माजी पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेविषयी तडजोड केली होती, असा आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला असून त्यामुळे खळबळ माजली आहे. काँग्रेसने पर्रीकरांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला असून पर्रीकरांनी ‘त्या पंतप्रधानांच्या’ नावाचा खुलासा करावा अथवा माफी मागावी अशी मागणी केली आहे.
गुरूवारी एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. ‘ पाकिस्तानमधून आलेल्या संशयित बोटीबद्दल अधिक माहिती का देण्यात आली नाही असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. अधिक माहिती जाहीर केली असती तर ती देणा-या सूत्रांचे नाव उघड होऊ शकले असते आणि सुरक्षा धोक्यात आली असती. काही पंतप्रधानांनी सुरक्षेविषयी तडजोड केली होती. मी त्यांच्या नावांचा खुलासा करू शकत नाही, पण ते कोण होते हे ब-याच लोकांना माहीत आहे’, असे ते म्हणाले.