राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त रॅली

0
12

गोंदिया, दि.25 : 25 जानेवारी या राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त आज (ता.25) इंदिरा गांधी स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नरेंद्र लोणकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसिलदार संजय पवार, नगर‍ परिषदेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे, अपर तहसिलदार श्री चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रॅली शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून सुरु होऊन नेहरु चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, जय स्तंभ चौक मार्गे इंदिरा गांधी स्टेडियम येथे पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री लोणकर यांचे हस्ते नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. रॅलीमध्ये मनोहर मुन्सीपल हायर सेकंडरी स्कूल, एस.एस.गर्ल्स कॉलेज, श्री राजस्थान कन्या कनिष्ठ महाविद्यालय, संत तुकाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, बाबलमल निचाणी आदर्श सिंधी हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रमाला निवडणूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.