राजस्थान: मिग-27 कोसळले; वैमानिक सुरक्षित

0
14

नवी दिल्ली- राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-27 विमान कोसळल्याची घटना आज (मंगळवार) घडली. सुदैवाने वैमानिक सुरक्षितरीत्या बचावला आहे.

बारमेर तालुक्‍यापासून 4 कि.मी. अंतरावर मिग-27 कोसळले. यावेळी वैमानिकाने बाहेर उडी मारल्याने तो बचावला आहे. भारतीय हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.