नीती आयोगाची पहिली बैठक 6 फेब्रुवारीस

0
24

नवी दिल्ली – देशातील नियोजन आयोगाच्या ऐवजी स्थापन करण्यात आलेल्या नीती आयोगाची पहिली बैठक येत्या 6 फेब्रुवारी रोजी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीस संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांकडून या आयोगाच्या भविष्यातील धोरणाविषयी निश्‍चित मार्गदर्शन यावेळी केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

नीती आयोग ही एक सरकारी संस्था असेल; वा निव्वळ आर्थिक बाबींवरील सल्लागार संस्था (थिंक टॅंक) असेल, यासंदर्भात या दिवशी निश्‍चित माहिती मिळण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. नीती आयोग सदस्य, देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित राज्यांचे नायब राज्यपाल यांचीही येत्या 8 फेब्रुवारी बैठक होणार आहे.

पंतप्रधानांनी गेल्या महिन्यामध्ये नीती आयोगासंदर्भातील विचार जाणून घेण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली होती.