दिल्लीत प्रदूषण वाढल्याने देशाची राजधानी नागपुरला हलवा- श्रीश्री रविशंकर

0
16

नागपूर,दि.17 –दिल्लीत प्रदूषण वाढले आहे. तसेच दिल्लीतील हवा देखील खराब आहे, त्यामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, असा सल्ला आध्यत्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांनी दिला आहे. श्री श्री रविशंकर नागपुरात एका कार्यक्रमासाठी बोलत होते.अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असलेले आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर हे उद्या (शनिवार) सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत. उभय नेत्यांमध्ये अयोध्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात अंतरंग वार्ता कार्यक्रमच्या निमित्ताने श्री श्री रविशंकर हे नागपुरात आले आहेत. ते उद्या शनिवारी संघ मुख्यालयात जाऊन डॉ भागवत यांची भेट घेणार आहेत. रविशंकर हे सध्या अयोध्या वादावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा करीत आहेत. विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या या मध्यस्थीला विरोध दर्शविला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविशंकर आणि भागवत यांच्यात चर्चा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रविशंकर यांनी शुक्रवारी लखनौ येथे ‘आॅल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे सदस्य मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते थेट नागपूरला आले. या वादाच्या पार्श्वभूमीवर ते शनिवारी सरसंघचालकांची भेट घेणार आहेत. संघ परिवारातील काही संघटनांकडूनदेखील रविशंकर यांच्या मध्यस्थीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सरसंघचालकांसोबतच्या त्यांच्या भेटीला जास्त महत्त्व आले आहे. या भेटीमध्ये राममंदिर मुद्याचा तोडगा निघावा यासाठी नेमकी काय पावले उचलली पाहिजे, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सोबतच रविशंकर हे संघासाठी काम करीत असल्याची टीका होऊ लागली असून मुलनिवासी बहुजनविरोधी भूमिकेबद्दल त्यांच्यावर नाराजी टिका केली जात आहे.