चंद्रपुरातील कोळसा खाणीत मातीचा ढिगारा कोसळला

0
44

चंद्रपूर,दि.०१ः-: येथील वेकोलीच्या माजरी येथील जुना कुणाडा कोळसा खाणीत शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास जवळपास अर्धा किलोमीटर अंतराचा मातीचा ढिगारा कोसळला. या विस्तीर्ण ढिगाऱ्याखाली दबलेल्या अनेक कामगारांपैकी फक्त तिघांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्रीच नागपूरला हलविण्यात आले.
मागील आठवड्यात याच परिसरातील तेलवासा खाणीत अशाच प्रकारची घटना घडली होती. तीत एका कामगाराचा मृत्यू झाला होता. जुना कुणाडा कोळसा खाणीत मध्यरात्री घडलेली ही घटना अधिक मोठ्या स्वरुपाची व गंभीर आहे. या ढिगाºयाखाली ८ व्हॉल्व्हो टिप्पर, दोन ड्रिल मशीन्स, ४ पीसी मशीन, एक सर्व्हिसिंग गाडी आणि असंख्य कामगार दबले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मदतकार्य वेगाने सुरू आहे.

वेकोलितील ही दुसरी घटना आहे. मागील आठवड्यात याच परिसरातील तेलवासा खाणीत अशीच घटना घडली होती. वेकोलि माजरीच्या तेलवासा खुल्या कोळसा खाणीत कोळशाचा ढिगारा कोसळला होता. यामध्ये तिथे काम करणारा डोजर ऑपरेटर निरजु झा (५५) हा दबून जागीच ठार झाला होता. या ठिकाणी काम करणारे दहा कामगार बचावले होते. मागच्या शुक्रवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली होती. वरती साठ ते सत्तर मीटर शेकडो टन कोळसा होता. त्यामुळे शनिवारी सकाळी ७-३० वाजता कामगाराचा मृततदेह बाहेर काढण्यात आला होता. तेलवासा खुल्या खाणीत कोळसा फेस वरून ३०० मीटर उंच आहे. याचे बनवलेले बेंच पूर्वीपासूनच धोकादायक होते. त्यामुळे गेल्या वर्षी वेकोलिच्या सतर्क विभागाच्या अधिका-यांनी खाण बंद करण्याचे आदेश दिले होते.