आंध्र प्रदेशच्या खासदार गीता यांना स्वाइन फ्लू

0
21

विशाखापटणम- आंध्र प्रदेशातील कॉंग्रेसच्या खासदार के. गीता यांना स्वाइन फ्लू झाला असून, उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) दिली.

आंध्र प्रदेशातील अराकू लोकसभा मतदारसंघातील गीता या खासदार आहेत. जिल्हा वैद्यकीय विभागाचे अधिकारी जे. सरोजिनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता यांच्या छातीमध्ये वेदना व ताप आल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गीता यांची प्रकृती स्थिर असून उपचाराला चांगल्या प्रकारे साथ देत आहेत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.