छत्तीसगडः नक्षल्यांच्या हल्ल्यात 2 पोलिस शहिद

0
9

रायपूर- छत्तीसगडमधील कंकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस शहिद तर 12 जण जखमी झाल्याची घटना आज (सोमवार) सांयकाळी घडली आहे.

छत्तीसगडचे पोलिस व सीमा सुरक्षा दलाचे जवान संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरुद्ध शोध मोहिम सुरू केली आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस हुतात्मा झाले असून, 12 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी जोरदार चकमक सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.