पोलिस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार

0
12

आल्लापल्ली,दि.10 –  एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाºया बांडेपल्ली जंगल परिसरात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास क्युआरटी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात एक पुरुष नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनात आज हालेवारा पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाºया बांडेपल्ली जंगल परिसरात क्युआरटी पोलिस पथक नक्षलविरोधी अभियान राबवित असताना दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. क्युआरटी पोलिस पथकाने नक्षल्याच्या दिशेन गोळीबार केला असता नक्षली जंगला पसार झाले. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळून आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.