सकल मराठा समाज नांदेड जिल्हा सार्व.शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्षपदी काळे

0
22
नांदेड दि. 10 -सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने यंदा 19 फेब्रुवारीला स्वराज्य संकल्पक, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. या अनुषंगाने काल शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सर्व सकल मराठा समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी पंजाबराव काळे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्षपदी फारूख अहेमद, उपाध्यक्षपदी सोपान नेवल, कोषाध्यक्षपदी चांदोजी सूर्यवंशी, कार्याध्यक्षपदी गणेश शिंदे, बालाजी शिंदे, कोअर कमिटीमध्ये समन्वयक म्हणून माधव पाटील देवसरकर, संतोष गव्हाणे पाटील, राजेश मोरे, गिरीष जाधव, डॉ. सुनील धोंडगे, विवेक पाटील, इंजि. तानाजी हुस्सेकर, भागवत देवसरकर, धनंजय सूर्यवंशी, अविनाश कदम, बालाजी जाधव, अमरजित पवार, दशरथ कपाटे, शिवाजी पावडे, अवधुत कदम, धनंजय पाटील, तानाजी पाटील, उमाकांत तिडके, विश्वजीत पावडे, गजानन कहाळेकर, सुनील पुयड, व्यंकटराव जाधव, नितीन गिरडे, सोपान कदम, स्वप्नील तळणीकर, राहुल धुमाळ, पंकज उबाळे, बंटी पाटील तळणीकर तर प्रसिद्धी प्रमुखपदी सोपान कदम यांची निवड करण्यात आली.
बैठकीत यावर्षी शिवजत्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले आहे. भव्य मोटार सायकल रॅली, प्रबोधनात्मक कार्यक्रम, शिवजयंती मिरवणूक आदींचे नियोजन बैठकीत करण्यात आले आहे यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले. बैठकीला सकल मराठा समाजातील सर्व सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.