ग्रामीण भागाचा विकास हे सरकारचे ध्येय, अरुण जेटलींच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

0
18

नवी दिल्ली ,दि.01- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता 2018-19 चा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. हा 88वा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकूण 87 केंद्रीय व अंतरिम अर्थसंकल्प सादर झालेले आहेत. मोदी सरकारचा हा पाचवा आणि शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. जीएसटी लागू झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.

LIVE UPDATE

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पीय भाषणास सुरुवात केली.

– आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकार शेतकऱ्यांना 11 लाख कोटी रुपये कर्ज देणार.
– कृषि क्षेत्राशी संबंधीत कंपन्यांना टॅक्समध्ये सवलत मिळणार.
2017-18 मध्ये 51 लाख घरे गरीबांसाठी बांधले जात आहे.
– 2018-19 मध्ये 51 लाख घरे बांधली जाणार आहे. म्हणजेच एक कोटींपेक्षा जास्त घरे गरीबांसाठी बांधली जात आहेत.
– 2018-19 या आर्थिक वर्षात 2 कोटी शौचालय बांधण्याचा संकल्प.
– दिल्लीतील प्रदुषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेगळी योजना तयार करणार.

– पूर नियंत्रण व्यवस्थेप्रमाणे ‘ऑपरेशन ग्रीन’ची सुरुवात करणार.
– पशुपालन आणि मत्स्यपानसाठीही मिळणार किसान कार्ड.
– गेल्या तीन वर्षात हे सरकार गरीबांची चिंता करत आहे.
– गरीब महिलांचा विचार करुन पंतप्रधानांनी उज्ज्वला योजना सुरु केली होती.
– आता सरकार 8 कोटी गरीब महिलांना गॅस कनेक्शन देणार आहे.
– 4 कोटी गरीब घरांना निशुल्क वीज कनेक्शन दिले जाणार.
– फार्म एक्सपोर्टसाठी 42 मेगा फूड पार्क तयार करणार.

– पंतप्रधान कृषी संपदा योजनेसाठी 2000 कोटी रुपये निधीची घोषणा.
– अन्न प्रक्रियेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद.

– शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दीडपट उत्पन्न मिळावे हा आमच्या सरकारचा संकल्प.
– आमच्या पक्षाच्या संकल्पपत्रातही याचा उल्लेख होता.
– आता शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल याकडे आमचे लक्ष आहे.
– आमच्या सरकारचा कोणत्याही विषयाला तुकड्या-तुकड्यात नाही तर एकत्रीत व संपूर्णपणे देण्यावर विश्वास आहे.

– इज ऑफ डुइंग बिझनेसेच्या पुढे जात आता आमचे सरकार सर्वसामान्यांच्या जीवितासाठी काम करत आहे.
– गरीबांना मोफत डायलेसिसची सुविधा सुरु केली आहे.
– सरकारी सेवा मग त्या रेल्वे तिकीट असेल किंवा पासपोर्ट आणि एका दिवसात रजिस्टर्ड होणारी कंपनी या सेवांमुळे नागरिकांना लाभ मिळत आहे.

– 10.53am – पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज संसदेत पोहोचले.

– केंद्रीय मंत्रिमंडळाने 2018-19 अर्थसंकल्पाला मंजूरी दिली.

– 9.58am : अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत पोहोचले.
– अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी जेटलींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.

शेती 

आज देशातलं कृषी उत्पादन रेकॉर्डब्रेक आहे, 3 लाख कोटी फळांचं यंदा उत्पादन झालं आहे

585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद

यावर्षी 27.5 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन घेण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे

470 बाजार समित्या eNAM नेटवर्कने जोडल्या, उर्वरित मार्च 2018 पर्यंत जोडल्या जातील

धान्य उत्पादनात वाढ होऊन 217.50 टन झालं  आहे. शेतकरी, गरीबांचं उत्पन्न वाढलं आहे. फळ उत्पादन 30 टन झालं.

शेतकऱ्यांच्या मालाला संपूर्ण हमीभाव देण्याचा प्रयत्न, आगामी खरीप हमीभाव उत्पादन खर्चाच्या दीडपट केल्याचा दावा

खरीप हंगामापासून हमीभावात दीडपट वाढ करण्याचा निर्णय

2022मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं मोदी सरकारचं लक्ष्य आहे

शेतकऱ्यांना  दीडपट भाव देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

डिजिटलायझेशनला वेग, कागदपत्र आता ऑनलाईन उपलब्ध होतात : अरुण जेटली

गाव-खेड्यांचा विकास आमचं ध्येय

भारत लवकरच जगातली सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था बनणार

जीएसटी आणखी सोपी करण्याची प्रकिया सुरु

गरिबी दूर करुन यंदाच्या बजेटमधून सर्व घटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न

यावर्षीचा अर्थसंकल्प शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला समर्पित

मोदी सरकारच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली

11.01 AM – Budget 2018 Live: अरुण जेटलींच्या भाषणाला सुरुवात

11.00 AM – अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पालघरचे खासदार चिंतामन वनगा यांना संसदेची श्रद्धांजली

10.39. AM : अर्थसंकल्प 2018 ला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी

10.35 AM: पहिल्यांदाच बजेटचं भाषण हिंदीत होणार, अर्थमंत्री अरुण जेटली संपूर्ण बजेट हिंदीत मांडणार

10.23 AM : बजेटपूर्वी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया –  स्वप्नं पूर्ण करणारा अर्थसंकल्प

10:15 AM: बजेटपूर्वी कॅबिनेट बैठक सुरु, अरुण जेटलींकडे सर्वांचं लक्ष

10.10 AM : बजेटनंतर अर्थमंत्री अरुण जेटली दुपारी 4 वा पत्रकार परिषद घेणार
10.03 AM : अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत दाखल

09.54 AM : अर्थसंकल्पाचे दस्तऐवज संसदेत दाखल