कुमडपार जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
10
file photo

गडचिरोली दि.3:- उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील कुमडपार जंगल परिसरात  २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास सी-६०जवान व नक्षल्यामध्ये चकमक उडाली. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून नक्षलसाहित्य जप्त केले.पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) डॉ. महेश रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) डॉ. हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनात २ फेब्रुवारी रोजी सी-६० चे जवान उपविभाग कुरखेडाअंतर्गत येत असलेल्या पोलिस मदत केंद्र मालेवाडा हद्दीतील कुमडपार जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जंगला दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनीही आत्मसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल जंगलात पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता घटनास्थळी एक ३०३ रायफल, दोन १२ बोअर रायफल, ४ पिट्टू तसेच नक्षल्यांचे जीवनावश्यक  साहित्य पोलिसांनी जप्त केले. सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.