जम्मूच्या सुंजवां आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद, 4 जखमी

0
17

जम्मू ,दि.10(वृत्तसंस्था)- येथील सुंजवा आर्मी कॅम्पवर शनिवारी पहाटे दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात असल्याचे सांगितले जात आहे. त्यात 1 जवान शहीद झाला असून दोन जवानांसह 3 जण जखमी झाले आहेत. या कॅम्पमध्ये तीन दहशतवादी लपले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांना पोलिसांनी घेरले असल्याची माहिती मिळाली आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कॅम्पच्या आत ठरावीक वेळानंतर फायरिंगचे आवाज येत आहेत. संपूर्ण शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कॅंपच्या 500 मीटरच्या परिसरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

जम्मू-काश्मीरचे डीजीपी एसपी वैद यांनी सांगितले की, दहशतवादी मागील दरवाजाने कॅम्पमध्ये घुसले. कॅम्पमध्ये तीन दहशतवादी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्यांना घेरण्यात आले आहे. हल्ल्यातील जखमींमध्ये एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरची मुलगीही आहे.न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार फायरिंगमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. मात्र अद्याप तशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

वृत्तसंस्थेनुसार, जम्मूचे आयजी एस डी सिंह जामवाल यांच्या हवाला देत सांगितले की, शनिवारी पाहाटे 4:55 वाजता संतरीच्या बंकरवर फायरिंग करण्यात आली. याला जवानांकडून प्रत्यूत्तरादाखल फायरिंग करण्यात आली. नंतर दहशतवादी सैन्याच्या एका कॉर्टरमध्ये घुसले आहेत.या दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कॅम्पच्या आसपास 500 मीटर अंतरावरील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.