भूमिपूजन केलेले काम पुर्ण करण्याची जबाबदारी आपली :पालकमंत्री आत्राम

0
16

गडचिरोली,दि.15(अशोक दुर्गम)- सिरोंचा तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून आज पर्यंत 100 कोटीचा निधी या तालुक्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.विकासकामांचे जे जे भूमिपूजन केले ते सर्व काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असून आपल्या कामाचे श्रेय लाटण्याचे काम काही करीत आहेत,अशाकडे जनतेने लक्ष देण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री राजे अमरीश आत्राम यांनी केेले.ते सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 4 कोटी निधीच्या इमारत बांधकाम भूमिपूजन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा योगीताताई भांडेकर होत्या.तर अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती श्रीमती उरेते, अहेरी विधानसभा प्रशिक्षण प्रमुख प्रकाश गेडाम, मुख्यमंत्री वाररूम प्रतिनिधी कुकडे,सिरोंचा नगर अध्यक्ष राजू पेद्दापल्ली, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संदीप राचर्लावार, जिल्हा आरोग्य अधिकारी शंभरकर,रंगय्यापल्ली सरपंच श्रीमती सोरते,पंचायत समिती सदस्य जमपन्ना दुर्गम, तालुका अध्यक्ष कलाम हुसेन ,नाविस उपाध्यक्ष संतोष पडालवार , वेंकटेश्वर येनगंटी,वाहिद भाई आदी मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलतांना पालकमंत्री आत्राम म्हणाले की,प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्यसेवा पुरविण्याच्या कळीमधील सर्वात खालचे एकक आहे.दूरवरच्या भागातील मनुष्यवस्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोचविण्याच्या उद्देशाने सरकारच्या धोरणानुसार.प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि परिचालनाबाबतचे सर्व निर्णय राज्य सरकारच्या आरोग्य विभागातंर्गत येत आहे.आरोग्य केंद्रासाठीच्या लोकसंख्येचा विचार केला तर सर्वसाधारण प्रदेशात ३० हजार लोकसंख्येमागे व दुर्गम-डोंगराळ प्रदेशात २० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक आरोग्य अधिकारी व त्याच्या साहाय्यासाठी १४ निमवैद्यकीय व इतर कर्मचारी असतात. प्राथमिक आरोग्य केंद्र हे २४ तास सेवा देते.हे केेंद्र सुध्दा लवकरच आपल्या सेवेत रुजू होईल असे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक संतोष पडालवार यांनी तर संचालन व आभार रंगय्यापल्लीचे सचिव धात्रक केले. यावेळी गटविकास अधिकारी खिराडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कन्नाके,आरोग्य अधिकारी डॉ गायकवाड, सचिन मडावी, तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश चाकींनारापूवर, ग्राम पंचायत सदस्य पुष्पलता कुम्मरी, मधु कुम्मरी, सत्यम कोरते, राजेश पेंढ्याला, श्रीनाथ राउत,दिलिप शेनिगरापू, मदनाय्या मादेशी विजय तोकाला, किरण कुलसंगे, किरण संगेम,अशोक पेद्दी, श्रीनिवास ओल्लाला, मालांना संगर्ती, राजेशम काशेट्टी राजबापू पोललंपल्ली, आदी कार्यकर्तेव हजारो रंगाय्यापल्ली येथील जनसमुदाय उपस्थित होते.