आसारामबापूला आजन्म कारावास

0
6

वृत्त संस्था
 जोधपूर दि.२५: बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून ६ तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.

जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत : आसाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

काय आहे प्रकरण ? : मुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप : उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.

साक्षीदारांच्या हत्या : आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करत. प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि आसाराम बापूचा सेवक अमृत प्रजापती यांच्यावर २३ मे २०१४ मध्ये राजकोटमध्ये गोळीबार केला होता. अमृत प्रजापती आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करत होते. आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. २००५ मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून त्यांनी आसाराम बापू यांच्याव

बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून ६ तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत.

जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत : आसाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.

काय आहे प्रकरण ? : मुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं होतं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. जोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप : उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.

साक्षीदारांच्या हत्या : आसारामबापूच्या समर्थकांनी साक्षीदारांना लक्ष्य करत. प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि आसाराम बापूचा सेवक अमृत प्रजापती यांच्यावर २३ मे २०१४ मध्ये राजकोटमध्ये गोळीबार केला होता. अमृत प्रजापती आसाराम बापू यांच्या आश्रमात काम करत होते. आसाराम बापूंना लहान मुलांसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघणारे प्रजापती या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. २००५ मध्ये त्यांना आश्रमातून काढून टाकण्यात आले होते.