मोदींच्या 12 मंत्र्यांसह, 65 खासदारांकडे आहेत गन

0
9

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 मंत्र्यांकडे गन आहेत. त्यात परदेशी पिस्टल, रायफल्स आणि रिव्हॉल्वर यांचा समावेश आहे. त्यांची किंमत 3 रुपयांपर्यंत आहे. या 12 मंत्र्यांपैकी 9 मंत्र्यांकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक शस्त्रे आहेत. मंत्र्यांनी मालमत्तेबाबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सर्वात महागडी गन संजीव बालयान यांच्याकडे
सर्वात महागडी गन कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्यमंत्री संजीव कुमार बालयान यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे तीन लाख रुपये किमतीचे एक रिव्हॉल्वर आहे. त्यानंतर क्रमांक लागतो, खाणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचा. त्यांच्याकडे 1.57 लाख रुपयांचे एक रिव्हॉल्वर आहे. तसेच 52,000 रुपये किमतीची एक रायफलही त्यांच्याकडे आहे. रसायन व खते मंत्री निहालचंद यांच्याकडेही 1.5 लाखांचे एख रिव्हॉल्वर आणि 50,000 रुपयांची .315 बोरची रायफल आहे. हत्यार बाळगणाऱ्या मंत्र्यांच्या यादीतही कृषीमंत्री राधा मोहन सिंह, कापडमंत्री संतोष कुमार गंगवार, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, पेयजल आणि स्वच्छता मंत्री राम कृपाल यादव, परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही के सिंह आणि सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांचा समावेश आहे.

शस्त्रांबाबतचे प्रेम मंत्र्यांपुरते मर्यादीत नसून लोकसभेच्या 75 खासदारांकडेही बंदुका, रायफली आहेत. त्यापैकी 65 भाजपचे खासदार आहेत. संसदेत भाजपचे एकूण 281 खासदार आहेत. शस्त्रे असलेले बहुतांश खासदार उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहार राज्यांचे आहेत. भाजपचे जे 65 खासदार गन बाळगतात,त्यापैकी 20 ते 25 जणांकडे एक किंवा दोन शस्त्रांचे परवाने आहेत. त्यात राम कृपाल यादव, राधा मोहन सिंह, ओमप्रकाश यादव, धरमबीर, अनुराग सिंह ठाकूर, लक्ष्मण गिलुआ, प्रल्हाद सिंह पटेल, उदयप्रताप सिंह, नागेन्द्र सिंह, अनुप मिश्रा, विंसेंट एच पाला, निहालचंद, संतोष गंगवार, वीरेन्द्र सिंह, जगदम्बिका पाल, राजवीर सिंह, अशोक कुमार दोहरे, मुकेश राजपूत, विजय कुमार सिंह, किर्ति वर्धन सिंह, आदित्यनाथ, कृष्ण प्रताप, केशव प्रसाद, नेपाल सिंह, शरद त्रिपाठी, राजेश कुमार सिंह आणि वरुण गांधींचा समावेश आहे.

राज्यवर्धन राठोड यांच्याकडे 12 गन
संख्येचा विचार करता ऑलिम्पिक पदक विजेते आणि गृह राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचा पहिला क्रमांक लागतो.त्यांच्याकडे 12 बंदुका आहेत. त्यापैकी अनेक त्यांनी बक्षीस म्हणून मिळाल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर आहे बीजेडी खासदार प्रत्यूषा राजेश्वरी सिंह. त्यांच्याकडे 6 शस्त्रे असून त्यात रायफल आणि रिव्हॉल्वर यांचा समावेश आहे. तिसरा क्रमांक लागतोतो बाजपच्या दिलीप सिंह भुरिया यांचा. त्यांच्याकडे चार शस्त्रे आहेत.

साधुंकडेही श्स्त्रे
विशेष म्हणजे खासदार बनून संसदेत पोहोचलेल्या साधूंकडेही शस्त्रे असल्याचे समोर आले आहे. स्वामी सच्चिदानंद हरिसाक्षी यांच्याकरे .32 बोरची एक रिव्हॉल्वर एक राइफल आणि एक 12 बोर गन आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडेही एख रिव्हॉल्वर आणि एक रायफल आहे.
‘आप’च्या भगवंत मान यांच्याकडेही गन
भाजप खासदारांशिवाय ज्यांच्याकडे गन आहेत, त्यात काँग्रेसचे विंसेंट एच पाला आणि रवनीत सिंह बिट्टी, ‘आप’ चे भगवंत मान, टीआरएसचे बीबी पाटील, समाजवादी पार्टीचे शैलेश कुमार, अपना दलचे कुंवर हरिवंश सिंह आणि आरजेडीच्या शैलेश कुमार यांचा समावेश आहे.