विद्यार्थिनींचा सुरक्षा रक्षकाकडून छळ

0
14

गोंदिया : येथील मागासवर्गीय मूलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाNया शालेय विद्यार्थीनींचा शारिरिक व माणसिक छळ होत असल्याची घटना (दि.२३) उघडकीस आली. वार्डन बार्इंची असभ्य वर्तनुक व गार्डच्या छळाला वंâटाळून अखेर येथील मुलींनी समाज संघटनांचे पदाधिकारी व समाजकल्याण अधिकारी पेंदाम यांना पाचारण करून येथील कारभार चव्हाट्यावर आणला. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेसाठी ठेवण्यात येणारा गार्डच त्यांना त्रास देत असेल तर मुलींची सुरक्षा करायची कुणी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विशेष समाज कल्याण विभागातर्पेâ कार्यान्वित मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शहरातील आरटीओ कार्यालय परिसरात आहे. या वसतीगृहात जवळपास ६० मुली आहेत. येथील मुलींना मागील काही दिवसांपासून कार्यरत वार्डन व क्रिस्टल वंâपनीतर्पेâ नियुक्त असलेला गार्ड मुलींना त्रास देत असल्याचा आरोप वसतिगृहाच्या मुलींनी केला आहे. मुलींचा व्यायाम सुरू असताना गार्ड असभ्य शब्दांचा वापर करून खालच्या स्तराची वागणुक करतो व मुलींना त्रास देतो अशा समस्यांचा पाढा मुलींनी समाजकल्याण अधिकारी पेंदाम यांच्या समक्ष वाचल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान त्रास देणाNया गार्डला मुलींच्या पुढे उभा करून समाज कल्याण अधिकारी पेंदाम यांनी त्याची झडती केली. त्रास देणारा तो गार्ड वसतिगृहातील वार्डन बार्इंचा भाऊ असल्याचे बोलले जाते. याबरोबरच वार्डनचे आईवडील देखील मुलींच्या कार्यात ढवळाढवळ करतात असा आरोपही मुलींनी लिखित तक्रारीत केला आहे. माणवाधिकार संघटनेच्या पदाधिकाNयांनी वसतिगृहाला भेट देवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी समाजकल्याण अधिकाNयांकडे केली. दरम्यान मुलींना त्रास देणाNया गार्डला त्वरीत काढण्यात यावे, अशी मागणी मुलींनी केली. येथील मुलींना मासिकपाळी संदर्भात हिन दर्जाची वागणुक दिली जात असल्याचा आरोपही मुलींनी केल्याने येथील मुली किती असुरक्षीत आहेत, याचा परीचय झाला. दरम्यान मुलींनी प्रत्येक्ष आपबिती सांगितल्यानंतर लिखीत तक्रार देखील समाजकल्याण अधिकाNयांकडे केल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या तक्रारीत मुलींना होत असलेल्या त्रासाबरोबरच पाण्याची समस्या, मतदान करायला मुलींना वार्डन जावू देत नाही, वाचनालयाला नेहमी कुलूपच असतो, इंटरनेटची सोय नाही, गरम पाण्याची सोय नाही, अशा अनेक समस्यांचा उल्लेख करण्यात आला. वसतिगृहात कार्यरत वार्डन व गार्ड या दोघांना आजच्या आज येथून काढण्यात यावे, अशी मागणी अन्यायग्रस्त मुलींनी समाजकल्याण अधिकाNयांकडे केली आहे. विशेष म्हणजे मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व समाजकल्याण अधिकाNयांपुढे मुली आपबिती सांगत असताना देखील वार्डनने गार्ड असलेला तिचा भाऊ त्याची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत असल्याने मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी तिच्यावर चांगलेच भडकले. पाठराखण करत असल्यामुळे नक्कीच वार्डन त्याला मदत करते असा आरोपही यावेळी करण्यात आला. सामाजिक न्यायमंत्र्यांच्या जिल्ह्यातच व समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्याच मुलींचा छळ होत असून त्या असुरक्षीत असल्याने या प्रकरणाची दखल न्यायमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी मुलींनी केली आहे.