तेलंगणा मुख्यमंत्र्यांनी कालेश्वर मंदिरातील पार्वती देवीला भेट दिलेली साडीची चोरी

0
16

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.26ः.सिरोंचा शहरापासून आठ कि.मी.अंतरावरील तेलंगणा राज्यातील भूपालपल्ली जिल्हातील कालेश्वर येथील अतिपवित्र कालेश्वर व मुक्तेश्वर मंदिराला मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव सह पत्नी भेट देऊन या मंदिरातील पार्वती देवीला मुकुट व साडीची भेट दिली होती.मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली साडीची मंदिरातून चोरी झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मेडीगड्ड सिंचन प्रकल्प कोनशीलन्यास करण्यासाठी तेलांगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे सहपत्नीक कालेश्वरला 2जून 2016 ला आले होते.कोनशीलण्यासापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पत्नीसह या मंदिराला भेट देऊन कालेश्वर मुक्तेश्वर स्वामींची पूजा अर्चा करून दर्शन घेतले .यावेळी मुख्यमंत्री व त्यांच्या सौभाग्यवतींनी या मंदिरातील अती पवित्र पार्वती देवीची दर्शन करून देवीला सोन्याची मुकुटासह किमतीवान साडी भेट दिली होती.
मुख्यमंत्र्यांनी देवीला भेट दिलेल्या या साडीची चोरी झाल्याची घटना आठवडा पूर्वी उघडकीस आल्याने तेलंगणा सरकारमधील संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची माहिती मिळताच तेलंगणा सरकारने या मंदिराचे या पूर्वीचे विश्वस्त मंडळाचे ई. ओ.हरीप्रकाश आणि बुर्री श्रीनिवास यांना निलंबित केले आहे.पार्वती देवीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या साडीची चोरी झाल्याची बाहेर येताच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे पोलीस आयुक्त , जिल्हा पोलीस अधीक्षक आदींनी मंदिराला भेट देऊन प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतले.या प्रकरणाची तेलंगणा सरकारने गंभीरपणे दाखल घेतले असून कसून चौकशी सुरु आहे.एक दोन दिवसात या चोरी प्रकरणाची माहिती बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.