कोत्तापल्ली नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने रहदारी बंद

0
13

सिरोंचा,दि.26ः-.तालुक्यातील पोचमपल्ली ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेलं कोत्तापल्ली येथील मुख्य रस्त्याचे नाल्यावरील रपटा मुसळधार पावसामुळे मागील पंधरा दिवसापूर्वी वाहून गेल्याने रहदारी पंधरा दिवसांपासून बंदच असून यामुळे परिसरातील जनतेला नाहक त्रास होत आहे.पंतप्रधान ग्रामीण सडक योजने अंतर्गत मागील काही वर्षांपूर्वी कोत्तापल्ली गावापर्यंत डांबरीकरण करण्यात आले . व या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी नाल्यावर रपट्याची हि बांधकाम करण्यात आले.
मुसळधार पावसामुळे या रस्त्याचे नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने रहदारी पूर्णतः पंधरा दिवसांपासून बंदच पडला आहे. रपट्याची दुरुस्तीकडे संबंधित विभागाची दुर्लक्ष होत आहे.
कोत्तापल्ली गावाची स्वस्त धान्य दुकान हे वडधम या गावात असून कोत्तापल्ली पासून 5 कि. मी. अंतर आहे .रस्ता बंद असल्याने कोत्तापल्ली गावातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणणे हि अडचणीचे ठरत आहे. रस्ता बंद असल्याने वडधाम पर्यंत पाच कि.मी.पायी जाऊन स्वस्त धान्य आणावे लागत आहे .
सिरोंचा मुख्यालयाशी सुद्धा या परिसरातील गावांची संपर्क तुटलेला आहे.या नाल्यावरील रपत्याची त्वरित दुरुस्ती करून देण्याची मागणी कोत्तापल्ली येथील गावकऱ्यांनी केली आहे.