आंबेनळी घाटात 500 फूट दरीत कोसळली, 34 पैकी 33 जणांचा मृत्यू

0
11

सातारा(विशेष प्रतिनिधी),दि.28 : महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात बस कोसळून भीषण अपघात झाला. या घाटातील दाभीक टोक जवळील 800 मीटर पेक्षा जास्त खोल दरीत ही बस कोसळली. यातील सर्व कर्मचारी कोकण कृषी विद्यापीठातील असून यामध्ये 31 कर्मचारी आणि दोन चालक असे एकूण 33 जण बसमध्ये होते. आतापर्यंत 26 जणांनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. या अपघाता केवळ एका कर्मचाऱ्याचा जिव वाचला असून 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेनेचे स्थानीक आमदार भरत गोगावले यांनी दिली.  दापोलीहून महाबळेश्वरला जाणारी मिनी बस शनिवारी सकाळी पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 500 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचालकासह 33 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. आश्चर्य म्हणजे या भीषण अपघातात एक कर्मचारी थोडक्यात बचावला. प्रकाश सावंत-देसाई असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. बस दरी कोसळत असताना देसाई बाहेर फेकले गेले. दरीत एका झाडाची फांदी त्यांच्या हाताला लागली. नंतर ते खोल दरीतून वर आल्यानंतर या भीषण अपघाताची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख..

पोलादपूरहून महाबळेश्वरला जाणारी बस खोल दरीत कोसळून 33 जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातावर देशाचे पंतप्रंधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘अपघातांमध्ये ज्यांनी प्राण गमावला आहे, त्याबद्दल दुःखी आहे. ज्यांनी आपले नातलग गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत.’, असे पंतप्रधानांनी ट्‍वीट केले आहे.मुख्यमंत्री,राज्यपाल यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

मृतांच्या वारसांचा 4 लाख रुपयांची मदत..
आंबेनळी घाटात झालेल्या भीषण बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला राज्य सरकारने 4 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना मोफत उपचार देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दापोलीहून महाबळेश्वरला ही बस निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. पुण्याचे NDRF चे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. या भीषण अपघातात सुदैवाने एकमेवर बचावलेल्या कर्मचार्‍याचे नाव प्रकाश सावंत देसाई असे आहे. अपघातग्रस्त बस ही खासगी कंपनीची होती. सर्व जण दापोलीहून पावसाळी पिकनिकसाठी महाबळेश्वरला निघाले होते, अशी माहिती मिळाली आहे.

भीषण अपघातातील मृतांची नावे…
1. संतोष झगडे
2. सचिन झगडे
3. संजीव झगडे
4. संदिप झगडे
5. राजाराम गावडे
6. पंकज कदम
7. सुनिल कदम
8. निलेश तांबे
9. सचिन गिम्हवणेकर
10. रितेश जाधव
11. हेमंत सुर्वे
12. राजेश सावंत
13. रोशन तबीब
14. किशोर चौगुले
15. विक्रांत शिंदे
16. राजू रिसबुड
17. रत्नाकर पागडे
18. प्रमोद जाधव
19. संदिप सुर्वे
20. प्रमोद शिगवण
21. संदीप भोसले
22. जयंत चौघुले
23. राजू बंडवे
24. संतोष जळगावकर
25. सुनील साठले
26. रविकिरण साळवी
27. प्रशांत भांबेड (बसचालक)