नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प उपेक्षित

0
154

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.01- नागझिरा हे महाराष्ट्रात तसेच भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य. प्राकृतिक सौंदर्याने मन मोहणारे असे हे वन आहे. तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्र मिळून तयार झाले असले तरी आज हे व्याघ्रप्रकल्प शासन दरबारी ताडोब्यासमोर उपेक्षितच ठरले आहे.
देशातील ४६ वे व्याघ्रप्रकल्प म्हणून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला १२ डिसेंबर २०१३ रोजी मंजुरी मिळाली असून महाराष्ट्रातील ५ व्याघ्र प्रकल्प ठरले आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान (१३३.८८० चौ.कि.मी), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (१२२.७५६ चौ.कि.मी), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५२.८१० चौ.कि.मी), नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (१५१.३३५ चौ.कि.मी) आणि कोका वन्यजीव अभयारण्या (९७.६२४) चे क्षेत्र मिळून तयार झाले आहे. चार अभयारण्य आणि एका राष्ट्रीय उद्यानामुळे तयार झालेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात विभागाच्या आकडेवारीनुसार ७ वाघ,४ वाघिण आणि ७ छावे असल्याची माहिती प्रशासन देत आहे.परंतु पर्यटकांच्या मते एकाचेही दर्शन होत नाही.
गेल्या अनेक वर्षांत या अभयारण्यातील माई ने अनेक वाघांना जन्म घालून व्याघ्र प्रकल्पाच्या समृद्धीत भर घातली. परंतू गेल्यावर्षी ७ मे रोजी माई कायमची सोडून गेल्यानंतर नागझिरा अभयारण्यात सध्यातरी कोणत्याही वाघाचे अस्तित्व नाही.वाघांची सायटिंक होऊ लागली असून भविष्यात येथे पर्यटकांची संख्या वाढणार आहे.नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्प हा कान्हा व्याघ्रप्रकल्प व ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी एक भ्रमणमार्ग ठरल्याने याठिकाणी वाघांचे अस्तित्व कमी दिसून येत असले तरी भविष्यात मात्र संख्येत वाढ होईल अशा आशावाद या विभागाच्या अधिकार्याना आहे.मात्र जो प्रसारप्रसिध्दी आणि सुविंधा ताडोब्याला मिळतात त्या याठिकाणी नसल्याने कुठेतरी उपेक्षितच म्हणावे लागणार आहे.
जिल्ह्यातील नवेगाव अभयारण्यात दोन नर वाघ आणि एका वाघिणीचे वास्तव्य (टी-६ ऊर्फ कानी) आहे. तसेच न्यु नागझिरा अभयारण्यात टी-४ ही वाघीण आपल्या चार महिन्यांच्या दोन छाव्यांसह पर्यटकांच्या नजरेस पडते. कोका अभयारण्यात एक नर वाघ आणि एक वाघिण( ३ छावे) आहे.या परिसरातील वाघ (डेंडू), वाघिण (अल्फा) व तिच्या दोन छाव्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. वनातील प्राण्यांना वनात तारांचे कुंपण घालून बांधून ठेवता येत नाही. मात्र मागील १० वर्षात नागझिरा, न्यू नागझिरा किंवा नवेगावबांध येथे वाघांची संख्या का वाढत नाही? हा अनेकांसाठी चिंतनाचा विषय झाला आहे.
जर आपल्याकडील वन्य परिसरातून वाघ-वाघिण दुसèया वनात जात आहेत तर मग दुसèया जंगलातील वाघ-वाघिण आपल्याकडील जंगलात का येत नाही? असेही प्रश्न निर्माण होतात. माईने आतापर्यंत नागझिरा परिसरात १० वाघ-वाघीणींना जन्म दिल्याचे सांगितले जाते. अशाप्रकारे माईमुळे या जंगल परिसरात वाघांची संख्या वाढली. पण आता माईचे नागझिरा येथे नसणे ही एक मोठी हानी समजली जाते. नागझिरा परिसरात जखमी होऊन एखाद्या वाघ किंवा वाघिणीचा मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात विस्तारलेले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आहे. यात नागझिरा, न्यु नागझिरा-नवेगाव व कोका अभयारण्याचा समावेश असून हे विदर्भाचे कान्हा केसरी म्हणून ओळखले जाते.एखाद्या जंगलाची श्रीमंती ही तिथल््या हिरवाईवर ओळखली जाते त्ङ्मापेक्षाही अधिक जैविक वैविध्ङ्मावरुन ठरविली जाते.२५ टक्के जंगल चारचाकी गाडीतून ओलाडंले की पर्यटकांसाठी तलावाच्या किनारी तयार करण्यात आलेले आकर्षक संकुलाच्या खोल्यांना ॠृतूंची नावे दिलेली आहेत.
हे राखीव क्षेत्र जैवविवधतेने संपन्न असून कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र राज्याचा पूर्वेकडील ग्रीन ओसिस आहे.समृद्ध वनसृष्टीचे दर्शन या अभयारण्यात घडते. जैवविविधतेने नटलेले हे अभयारण्य उष्ण पानगळीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचे विविधता आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती झाडांवर डोलताना दिसून येतात. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. मोठे वृक्ष, वेली, वनौषधी देखील या जंगलात सापडतात.
या अभयारण्यात जवळपास ३०० पक्षांची नोंद आहे. ढाण्या वाघासमवेत बिबट्या, रानकुत्रा, लांडगा, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, चौशिंगा, नीलगाय, चितळ, सांबर, काकर, रानमांजर, उदमांजर, ताडमांजर, उडणखार, सर्पगरूड, मत्स्यगरूड, टकाचोर, खाटीक, राखी धनेश, नवरंग कोतवाल अशा अनेक प्राणी आणि पक्षांचा निवास येथे आहे. तब्बल ३५ प्रजातीचे प्राणी या जंगलात आढळून येतात. तसेच येथे सरपटणाèया प्राण्यांच्या ३४ प्रजाती तर विविध पक्ष्यांच्या १६६ प्रजाती आढळतात.