‘राष्ट्राचे भवितव्यात महिलांची मोठी भूमिका’

0
12

– – वृत्तसंस्था
नवी दिल्ली – राष्ट्राच्या भवितव्य घडविण्यात महिला मोठी भूमिका बजावत असल्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज (शनिवार) म्हटले आहे. दरवर्षी आठ मार्चला जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर मुखर्जी यांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला आहे.

मुखर्जी पुढे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी भारतीय महिलांना शुभेच्छा देतो.‘ पुरुषाच्या जडणघडणीत महिला सर्वोच्च प्रेरणास्थान असल्याचे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिल्याचा उल्लेखही मुखर्जी यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले की, “राष्ट्राच्या भवितव्यात महिला मोठी भूमिका बजावतात. श्रम आणि प्रेमाच्या माध्यमातून राष्ट्राला अनमोल उपहार देणाऱ्या सर्व महिलांना माझा प्रणाम‘ महिलांची सुरक्षा आणि त्यांचे कल्याणाद्वारे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपणास त्यांच्याशी असलेल्या बांधिलकीला नवचैतन्य देण्याची संधी असल्याचेही ते पुढे म्हणाले.