राष्ट्रवादीने पहिल्याच दिवशी केला शासनाचा विरोध

0
8

मुंबई- आजपासून सुरु झालेल्या अथर्संकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सेना सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या प्रवेशदाव्रार घोषणा देत निषेध नोंदविला.तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत नाही, त्यातच रब्बीची मदत मिळालेल्यांना खरीपाची भरपाई नाही असे संतापजनक वक्तव्य, पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या आणि त्यांचे मोकाटच असलेले मारेकरी… अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरली आहे,अशी टिका केली. आज अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद आणि विधानसभेतील सदस्यांनी या सरकारचा जोरदार निषेध केला. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आमदार सुनिल तटकरे, आमदार जितेंद्र आव्हाड,छगन भुजबळ,राजेंद्र जैन आणि इतर सदस्यांनी निषेधाचे फलक दाखवत सरकारविरोधातील रोष व्यक्त केला.