यवतमाळ-कळंब मार्गावर भीषण अपघात,9 ठार

0
8

यवतमाळ,दि.२५-यवतमाळ-कळंब मार्गावरील चापर्डा गावाजवळ सोमवारला रात्री ९ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 9 ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना घडली.हा अपघात ट्रक व क्रुझरगाडीच्या धडकेत झाला असून मृत हे कळबं तालुक्यातील पारडी येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे.कळंब तालुक्यातील पार्डी(सुकळी) येथील कांबळे व थूल परिवारातील सदस्य साक्षगंधासाठी यवतमाळ येथे गेले होते. साक्षगंध आटोपून क्रुझरने (एम.एच.२९/आर-७१५९) रात्री सर्व सदस्य कळंब मार्गे पार्डीला जात होते. याचवेळी चापर्डानजीक समोरून सिलिंडर भरून येणा-या ट्रकने (एम.एच.४०/३२८८) क्रुझरला जोरदार धडक दिली.

मृतांमध्ये नियोजित वर नितीन रमेश थूल याची आई सुशीला रमेश थूल (५०) व वडील रमेश पुंडलिक थूल (५५) यांचा समावेश आहे. या दोघांशिवाय तानबा पुंडलिक थूल (६५), क्रुझर चालक सचिन बाबाराव पिसे (२२), सोनाली शैलेश बोदडे, सक्षम प्रशांत थूल (८ वर्षे) व अन्य तीन जण ठार झाल्याचे कळंबचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. उर्वरित तिघांची नावे कळू शकली नाही. जखमींमध्ये वर नितीन रमेश थूल, अमोल नवघरे (२५) रा.नागझरी (ता.देवळी) आणि शैलेश शालिक बोंद्रे (४५) रा.पार्डी, शरद बाबाराव कांबळे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.