राज्यातील वैदू समाजाची जात पंचायत रद्द

0
14

अहमदनगर- जातपंचायतींच्या जाचक निर्णयांमुळे आजवर अनेकांवर बहिष्कार घालण्यात आला. पण, जातपंचायतींच्या या दादागिरीवर आळा घालण्यासाठी आज एक पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं पाऊल पडलं आहे. राज्यातील वैदू समाजानं आपली जातपंचायत बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.या निणर्यामूळे राज्यातीलच नव्हे तर देशातील जातपंचायतीना सुध्दा नवा विचार करण्याचा मार्ग या जातपंचायतीने दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये अखिल भारतीय वैदू जातपंचायतीचे मुख्य न्यायाधीश चंदरबापू दासरयोगी यांनी वैदू समाजाची जातपंचायत रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. या बैठकीत राज्यातील वैदू समाज जातपंचायतीचे अध्यक्ष शामलिंग शिंदे यांच्यासह समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडेे आणि रंजना गंवादे हेसुद्धा उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतींकडून समाजघातकी निर्णय दिले जात होते. त्यामुळे जातपंचायतीच्या जाचक निर्णयांपासून संपूर्ण वैदू समाजाची सुटका झाली आहे.
या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :
वैदू जातपंचायत बरखास्त
यापुढे वैदू समाजाची जातपंचायत भरणार नाही
जातपंचायतीने यापूर्वी बहिष्कार आणि वाळीत टाकण्याचे दिलेले सर्व निर्णय रद्द